STORYMIRROR

Sanjay Gurav

Others

3  

Sanjay Gurav

Others

रे मना..

रे मना..

1 min
33

थांग तुझा लागाया

मारावी एक डुबकी

की सरळ एक सूर..

कितीही यत्न केला

तरी धपापतोच ऊर

रे मना...


तू संवाद साधलास 

तर पावसाशिवाय 

येतो भावनांचाच पूर..

तू हात हाती घ्यावा

आणि उडावे वाटे भूर्र

रे मना...


नेमकं कुठं साठवतोस

आहेत किती कप्पे तुला

लागत नाही ताकास तूर..

नेमका कशाने क्षणोक्षणी

बदलतो सांग तुझा नूर

रे मना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन