रांगोळी
रांगोळी
1 min
311
श्री महालक्ष्मी द्वारी
सुरेख रांगोळी सजली
मनातील अहंकारची
मशाल क्षणात विजली
द्वारी भक्तीची
ओंजळ रीती झाली
अशिवादाची तिच्या
डोईवरी बरसात झाली
अमृत क्षण हा
जीवनी आज आला
कृथार्थ जीवन
सफल करण्याला
आई तुझी कृपा
अशीच अखंड असू दे
पाठीवर माझ्या
हात तुझा सदैव राहू दे
