STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

1 min
177

राजनीती आणि संस्कारांचा, एकत्र घालूनी मेळ।

जन्म देऊनी जिजामातेनं, दिले शिवबाला बळ।।धृ।।


अशी असावी माता आमुची, निर्भय आणि बेडर।

शत्रूला जणू कंप सुटावा, असा मनी तिचा निर्धार।।

सत्ता होती गनिमाची येथे, अन निजाम सत्ताधारी।

तरी सोळाव्या वर्षी शपथ घेतली, रायरेश्वर मंदिरी।।

तोरणा घेवून बाल शिवाने, वाढवले मावळी बळ।

जन्म देऊनी जिजामातेनं, दिले शिवबाला बळ।।१।।


गीता आणि रामायणाची, माय जिजाऊ सांगे गोष्टी।

अन कान देऊनी शिवबा ऐकतसे, मनात होई कष्टी।।

गनिमी कावा करून शिवाने, रण माजवले भारी।

मामा शाहिस्तेखान पळाला, बघा बोटे तुटता जरी।।

शत्रुलाही दिली चपराक शिवाने, शत्रूला चारुनी धूळ।

जन्म देऊनी जिजामातेनं, दिले शिवबाला बळ।।२।।


जिजाऊच्या संस्काराने शिवबा झाले, स्वराज्याचे धनी।

स्फूर्ती त्यांची आजही स्मरते आहे, आमच्या मनातुनी।।

नाव शिवबाचे येता ओठावर, माय जिजाऊ आठवते।

पुत्र दिला स्वराज्यासाठी म्हणुनी, नाव तिचे गाजते।।

अशीच आमची माता असती, हे शिवबाचे ऐकता बोल।

जन्म देऊनी जिजामातेनं, दिले शिवबाला बळ।।।३।।



Rate this content
Log in