राजकारण
राजकारण
1 min
26.8K
बोलाचा भात नि बोलाची कढी
प्रसादास चढविती नेते मंडळी
आश्वासनाची स्वप्न मग लावाव्यास तोंडी
कृती फुटकळ अपेक्षा मोठी
राजकारणाचे हल्ली काही नाही खरे
कधी पक्षकलहाचे धर्मसंकट
कधी गटबंधनांचे जुळतात येथे वारे
पक्षचिन्हांचे तर माजते थैमान
सायकलपासून दिव्यापर्यंत
दावित सरी कमान
निवडणुका जाती निवडणुका येती
मत मागणीची आठवण मात्र सोडूनी जाती
जनसामान्यांची सुटका नाही
खोट्या आश्वासनांचा बोलाचा भात नि कढी
हसत चाखावे सर्व काही
