Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

5.0  

Chandan Pawar

Others

राजे ,या भ्रष्टाच्या माथी ....

राजे ,या भ्रष्टाच्या माथी ....

1 min
353


राजे, होऊ नये त्या 

सगळ्यांचा 'कळस' झालाय,

ज्याचा येऊ नये 

त्याचाच 'किळस' आलाय.

पूर्वी कधीच नव्हता

असा भ्रष्टांचा' बाजार' आहे,

सत्ता-खुर्ची-प्रतिष्ठेचा सर्वत्र

मानसिक 'आजार' आहे.

सत्तेच्या राजकारणाला

असत्याची 'रंगरंगोटी' आहे,

सगळ्याच राजकारण्यांना

भ्रष्टाचाराची 'लंगोटी' आहे.

यांची ही 'पुढारीशाही'

तुम्ही एकदा "खोटी" म्हणा,

राजे, या भ्रष्टांच्या 

माथी तलवार हाना.


अजून यांना माहित नाही

बोलले तसे 'वागले' पाहिजे,

भाषणातल्या शब्दाशब्दाला

प्रत्यक्षात 'जागले' पाहिजे.

जुनाच त्यांचा गळा मात्र

नवा नवा 'सूर' आहे,

सत्ताधीशांच्या तोंडी

आश्वासनांचे 'पूर' आहेत.

आश्वासनांच्या जोरावरच 

जोरात यांचा 'धंदा' आहे,

ही आश्वासने म्हणजे 

जनतेसाठी फाशीचा 'फंदा' आहे.

"हर हर महादेवाचा" मंत्र

एकदा यांच्यासाठी म्हणा, 

राजे, या भ्रष्टांच्या

माथी तलवार हाना.


पक्षनिष्ठेच्या नावाने आज

सगळीकडे 'ठो-ठो' आहे,

आजकाल कुणाच्याही बॅनरवर

कुणाचाही' फोटो' आहे.

इकडे जाऊ कि तिकडे जाऊ

दोन्ही डगरिंवर' हात' आहे,

पक्ष कोणताही असला तरी

तिकीट मिळण्याशी 'बात' आहे.

शेवटी तिकीट महत्वाचे 

पक्ष-बिक्ष सबकुछ 'झूठ' आहे, 

उघडी कशाला करायची ही

तर झाकलेली 'मूठ' आहे.

यांच्या पाठीवर थाप मारून

तुम्ही एकदा "शाब्बास" म्हणा,

राजे, या भ्रष्टांच्या

माथी तलवार हाना.


प्रत्येकदा खुर्चीवर फक्त

यांचाच 'दावा' आहे,

घराणेशाहीचा अर्थ फक्त

यांनाच 'ठावा' आहे.

मी मोठा की तू मोठा

याचेच स्तोम 'फार' आहे,

घराणेशाहीच्या टोळ्यात आज

जणू 'गॅंगवार' आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत फुटकळ

नेत्यांची 'गर्दी' आहे.

राजकारण कुठे चाललंय?

घराणेशाहीची ही 'वर्दी' आहे.

यांची ही 'घराणेशाही' एकदा

तुम्ही "स्वार्थी" म्हणा, 

राजे, या भ्रष्टांच्या

माथी तलवार हाना.


'लुटा अन लाटा' हाच

आजचा राजकीय 'मंत्र' आहे, 

लोकशाहीतील 'आदर्श'

राजकारणाचे हेच 'तंत्र' आहे.

ज्याच्या हाती सत्ता 

त्यांनीच 'लाटले' आहेत,

कुणी फ्लॅट, कुणी प्लॉट

आपापसात 'वाटले' आहेत.

भूखंड-स्टॅम्प-सिंचन योजना

ठरवून 'ओढल्या' आहेत,

काळेबेरे करण्याकरता कोळशाच्या

खाणीही 'खोदल्या' आहेत.

यांच्या या 'राजकीय' तंत्रास

तुम्ही शुध्द "फसवणूक" म्हणा,

राजे, या भ्रष्टांच्या

माथी तलवार हाना.



Rate this content
Log in