STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

राजे आज तुम्ही हवे होता

राजे आज तुम्ही हवे होता

1 min
205

राजे आज तुम्ही हवे होता

स्वराज्यरक्षणासाठी,लोककल्याणासाठी

आज तुम्ही हवे होता

जातपातीच ना राजकारण

फक्त माणुसकीचच जतन करण्यास

आज तुम्ही हवे होता

बळीराजाच्या राज्यनिर्मितीसाठी

मोत्याच्या पिकासाठी

आज तुम्ही हवे होता

आई,बहीण,मुलीचं शील जपण्यासाठी

घरोघरी लक्ष्मी सुखात नांदण्यासाठी

आज तुम्ही हवे होता

सत्तेसाठी ना खुर्चीसाठी

प्रामाणिक नीतीसाठी,

मातृभूमीच्या अस्मितेसाठी

आज तुम्ही हवे होता

पोरक्या महाराष्ट्रास तारण्यासाठी

मायबाप रयतेचा जाणता राजा

छत्रपती शिवाजीराजे

आज तुम्ही हवे होता


Rate this content
Log in