पूर्वरंग....!
पूर्वरंग....!
1 min
288
पूर्व क्षितिजी
अभा फाकली
तेजोमय
रविराजाची....
किती सुंदर
सुरुवात झाली
आज पहा
गोड दिवसाची....
पहिल्या चहाची
लज्जत भारी
चवही न्यारी
प्यारी प्यारी...
हीच जीवनाची
गोडी अवीट
सौख्याची
नांदी खरी....
तो देतो
उदंड आनन्द
भोगूया स्वानंद
आनंदे....
जळी काष्टी पाषाणी
त्याचे वास्तव्य
सुखकर हे
सदैव नांदे....
तेज पाहता
वाटे मज
हेच सत्य अंती
ब्रह्मांडी सत्य नुरे!
