STORYMIRROR

Sanjay Gurav

Others

4  

Sanjay Gurav

Others

पुस्तकं..

पुस्तकं..

1 min
24.2K

एक मुक्काम करावा

पुस्तकांच्या गावात.

पुस्तकंही बोलतात बरं

आपलेपणाच्या भावात...


पुस्तकाचा पहिला गंध 

भरून घ्यावा वक्षात

पहिलं पान पुस्तकाचं

सदैव ठेवावे लक्षात.


पहावी करुन कधी

पुस्तकांशी मैत्री

दगा देणार नाहीत

असावी ही खात्री.


एकटे जरी असला तरी

सोबत असता पुस्तकाची

गजबजलेल्या गावामध्ये

मुशाफिरी मात्र हक्काची.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ