पुस्तके
पुस्तके
किती रमावं किती बागडावं
जादू काही वेगळीच पुस्तकांची
पुस्तकांच्या विशाल महासागरात उडी घेतल्यास
मनाला बळ देतात पुस्तके ही भरारी मारण्यासाठी
विचारांच्या वेगवेगळ्या लाटांवर आरुढ होत
संस्काराची शिकवण देते आपल्याला जगण्यासाठी
जीव रमतो पुस्तकांच्या सहवासात
पुस्तके साथ देतात आयुष्याच्या प्रवासात
बोटाला धरून वेगळ्याच दुनियेत नेतात
ज्ञानात आपल्या अधिक भर घालून कल्पनेच्या ओघात वाहून नेतात
किती वेदना, किती दुःख साठवून ठेवतात
आनंद तितकाच उधळीत असतात
वेळो वेळी भटकलेल्याला
वाट दाखवतात ,रडणारयाला हसवतात
कधी शहणपण शिकवतात कधी वेड लावतात
सतत आपल्याला काहीतरी देत असतात
पुस्तके ही वाचणारयाचा जीव की प्राण असतात
पुस्तकांच्या पानापानात ज्ञानाचे वाहतात अमृत झरे
पण जे वाचतात पुस्तके त्यांनाच ज्ञानामृत मिळते खरे
पुस्तकातील शब्द अन् शब्द मनावर आपल्या संस्कार करतात
भाग्यवान ते पुस्तकाचे गुण आत्मसात करतात
प्रत्येकच पुस्तकातून पेरला जातो विचार नवा नवा
म्हणून पुस्तकाला आपला चांगला मित्र बनवा
पुस्तके वाचण्याचा ही असावा सुरेल असा छंद
दरवळेल तुमच्या ज्ञानाचा समाजात मग अत्तरासम सुगंध
