पुरुषोत्तम राम...
पुरुषोत्तम राम...
राम नवमी करे साजरी
सगळा संसार करे गुणगान
जन्मला कौसल्या नंदन
उपजला दशरथ अभिमान ।।१।।
प्रभूचा नारायणी अवतार
मर्यादा पुरुषोत्तम असे राम
ब्रह्मांड अवघा होई विलीन
जपता तल्लीन राम नाम ।।२।।
अयोद्ध्येचा प्रिय राजकुमार
लाडका सर्वांचा भाऊराया
अर्धांगिनी ममतेची सावली
आईरुपी सीतामाता माया ।।३।।
कैकेयीच्या ठायी मातारूप
विना दोष वनवास केला पूर्ण
साजरा हर्षात दीपावलीचा सण
संपूर्ण जीवन नावात परिपूर्ण ।।४।।
संकटकाळी घेता पवित्र हरिनाम
दूर होई वाईट दुष्टांचा भयपट
सत्याचा असा श्रीराम महापुरुष
चरण स्पर्शिता पावन जीवनपट ।।५।।
