पुरुष ना तू...
पुरुष ना तू...
1 min
12.1K
पुरुष ना तू...
मग हे चालायचंच...!
पावित्र्याच्या पारड्यात
स्त्रीला तू तोलायचंच...!!
वाटेल तेव्हा तिच्याशी
अबोला तू धरायचा...!
मनात येईल तेव्हा
अपमानही करायचा...!!
स्वतःच्या मर्जीप्रमाणे
हवं तसं वागायचं...!
तिच्या वागण्याचं मात्र
स्पष्टीकरण मागायचं...!!
ओझं तुझ्या अपेक्षांचा
आयुष्यभर लादायचं...!
तू चुकलास तर चालेल
पण तिने नाही चुकायचं...!!
बनून तुझी सहचारिणी
संसार करते सुखाचा...!
केलास का कधी तू
विचार तिच्या मनाचा...!!