पत्रास कारण की
पत्रास कारण की
पत्रास कारण की
सरले किती दिवस ना गाठभेठ झाली
तुझ्या भेटीची मनाला ओढ भारी लागली
एकांत मला नको हवी आहेस नजरेसमोर
तुझ्या विना विसरले अंगणात नाचणे मोर
पत्रास कारण की
मनात काहूर माजले आठवणींचा उमाळा दाटला
खर सांगू का सखे जरा एकटेपणा वाटला
दिवस निघून गेले ना भेट आपली घडली
काळजातील धडधड मात्र अचानक माझ्या वाढली
कसे सांगू तुला सखे ओढ जीवाला लागली
शब्दांनी केले बंड अन साद तुला घातली
पत्रास कारण की
कुणाला सांगू सखे माझ्या मनातल्या व्यथा
पोरखेळ वाटेल सारा वाटतील वेड्या भाकडकथा
मन आता कुठेच माझे रमत नाही
तुझ्या विना राणी आता मला गमत नाही
एकच आहे मागणे आता ये सामोरी अशी
मी तुझा चंद्र अन् चादंणी तू माझी जशी.
