STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

4  

Sangeeta GodboleJoshi

Others

पत्र ..

पत्र ..

1 min
819

एक लिफाफा ..


वर सुवाच्य अक्षरातलं ..

शब्दांनाच काय ..

अक्षरांनाही मोठ्या रेखीवपणे मांडलेलं ..

आपलं नाव ..

ठसठशीत ..

तरीही ..

भावनांनी ओथंबलेलं ..

आत ..मनोगत ..

असंच असावं ..असं वाटत रहातं सतत ..

किती विचित्र असतं नाही मन ..

कुणी पाठवलेल्या त्या कागदावर ..कदाचित् ..रंगीत ..किंवा सुशोभितही ..

जितक्या आसुसलेल्या नजरेनं डोळे पहात असतात ती नक्षी ..

त्यापेक्षा कितीतरी पटीनं ..

शोधत असतात ..त्यात आलेलं ..आपलं नाव .

कागदावर ..

पांढऱ्यावर काळं केलेलं ..

काहीही ..फक्त आपल्यासाठी ..

कधी ..

नुसता कोराच कागद ..

लिहू लिहू म्हणत ..

काहीच नं लिहिलेला ..

तरीही ..

हळूच काहीतरी सांगणारा ..

कधी काही जीवाच्या आकांतानं ..लिहिलेल्या ओळी ..खोडलेल्या ..

समोरच्याला कळू नयेत म्हणून ..

तरीही ..उभा ..आडवा

तिरका उलटा सुलटा ..उजेडाकडे ..

उजेडाविना ..कसा का होईना ..काहीतरी का होईना ..त्या खोडलेल्या शब्दांचा माग घेतंच मन ..

अन् हळहळतही रहातं ..

विषयच नाही कळला म्हणून ..

खरंतर ..

त्या अव्यक्ताचीच भारी ओढ वाटत रहाते .

जीवघेणी ..


उच्चारापेक्षा अनुच्चारित काय असावं ..या विचारानं जीव हैराण ..


शब्दातलं ..अलिकडचं पलीकडचं ..

नि ..नं दिसणारं ..दोन शब्दांच्या मधलंही ..


पुन्हा पुन्हा वाचायची मोकळीक ..

त्यासाठीच ..यावंसं वाटतं ..एखादं तरी पत्र ..


शब्दात मांडता नं येणारा आनंद देणारं ..

हस्तलिखित ..

पत्र ..


Rate this content
Log in