पशूसंवर्धन (सहाक्षरी)
पशूसंवर्धन (सहाक्षरी)
1 min
173
मानव जातीस
उपयोगी किती
पाळीव ते प्राणी
सांभाळ करती.....१
शेतीच्या कामात
मदत करती
बैलगाडी पहा
खिल्लार हाकती....२
जनावरे पहा
आहेत दुभती
दही, लोणी, तूप
सुदृढ करती....३
घराची राखण
रक्षण करती
गोठ्यात दावणी
समृध्दी नांदती....४
सुखात दुखात
साथ तेच देती
पशू असे सदा
आपले सोबती....५
पशूसंवर्धन
गरज आज ती
निसर्ग चक्राची
पूर्तता करती......६
