STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Others

3  

Shravani Balasaheb Sul

Others

पर्यावरणाची हाक

पर्यावरणाची हाक

1 min
321

मानव का निर्भीडपणे,

 प्रदूषण करत भटकत आहे..

श्वास प्राणदायी हवेचा,

 ऊरात तिच्या अटकत आहे..

वागणे हे आपले असे,

 मनास तिच्या खटकत आहे..

रुसवा तिने धरला म्हणून,

 प्राण आपुले निसटत आहे..


करी कु-हाडी आपल्या पाहता,

 पर्णांत तरुच्या थरथर आहे..

त्या वृक्षास होती अंतर्वेदना, 

 ते कठोर फक्त वरवर आहे..

या झाडांवरती पक्षी सारे,

 आयुष्यभर खेळती घरघर आहे..

हत्येस हात उचलू नका,

 निसर्ग ऋणांची जाणीव जर आहे..


सरितेचे सार न स्मरणे,

 हा शिवशंभूचा अपमान आहे..

नदीमायेस ज्या दुषित केले,

 ती नीळकंठाच्या माथी विराजमान आहे..

तटिनी ही सजीवसृष्टीस,

 भगवंताचे वरदान आहे..

पात्र तिचे सुस्वच्छ राखणे,

 हाच तिचा सन्मान आहे..


वाहनांच्या धुरात गुदमरून,

 प्राणवायू मरत आहे..

व्यर्थ नका जाळू इंधन,

 पर्यावरण तक्रार करत आहे..

वृक्ष ना जेथे थेंब पावसाचे,

 तेथे ना पडत आहे..

पाषाणांच्या पदराआडूनी,

 धरणीमाय रडत आहे..


पर्यावरण -हासापायी,

 ऋतूंचे गाणे अडकत आहे..

वीज आपुल्या डोईवरी,

 धोक्याची का कडकत आहे..

मनी आता पर्यावरणाच्या,

 प्रतिशोधाग्नि भडकत आहे..

मात्र रक्षणार्थ वृक्षांचे कुंपण,

 हिरवी पताका फडकत आहे..


नजरेत भुईच्या जलधारांच्या,

 आगमनाची आतुरता आहे..

थेंबात पहिल्या सुमनापरी,

 सुगंधातच तिची तृप्तता आहे..

छंद छेदून निसर्गाचा,

 स्वच्छंद जगण्यात व्यर्थता आहे..

ढाल बनू या या सृष्टीची,

 मनी जर थोडी सतर्कता आहे...!


Rate this content
Log in