प्रवास अखेर ( सहाक्षरी )
प्रवास अखेर ( सहाक्षरी )
1 min
157
लढलो लढाई
बघ जगण्याची
साथ ती असावी
या सांजवेळची......१
हाती तुझा हात
गोडी संसाराची
नाही रडगाणे
धुंदता प्रेमाची......२
तीच सायकल
साथ सवारीची
गुलाबी रंगत
डबल सिटाची......३
तुझा आधार तो
पकड खांदयाची
उजव्या बाजूला
डोके टेकण्याची.....४
प्रवास अखेर
आस जगण्याची
पुन्हा जन्मो जन्मी
तुझीच होण्याची...५
