प्रत्येकाची रीत वेगळी
प्रत्येकाची रीत वेगळी
1 min
211
काव्यप्रकार अष्टाक्षरी
सुंदरचि हे जीवन
दान दिले दैवदत्त
बहुरंगी हा दर्शक
क्षण सजावा प्रत्येक (1)
पूर्व प्राक्तनानुसार
सुख-दुःख भोग येत
मात धीराने करुनी
क्षण सजवी प्रत्येक (2)
कला उपजत अंगी
व्यग्र असे साधनेत
पूर्णत्वासी नेल्यावरी
क्षण सजवी प्रत्येक (3)
जीवनाच्या यज्ञामधी
सुख टाकी समिधेस
सदा परहितासाठी
क्षण सजवी प्रत्येक (4)
कुणी देशप्रेमासाठी
धावे रक्षणसेवेस
राही कुटुंब सोडूनी
क्षण सजवी प्रत्येक (5)
क्षण क्षण आयुष्याचे
साध्य असे आगळेच
रीत असू दे वेगळी
क्षण सजवी प्रत्येक (6)