STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

परतफेड

परतफेड

1 min
5.1K


आयुष्याचा भरवसा नाही,

पुढचा तास आपला नाही !

परतफेड करावी का सगळ्यांची?

उगीच आलं मनात. .

डायरी काढली,

हिशोब मांडला,

आर्थिक हिशोब -

झाला काहीच मिनिटात.

जमा, खर्च, संपत्ती

सहजच झालं-

देणेघेणे, गोळाबेरीज

संपलं ना दिवसभरात.

कसं हलकं हलकं वाटलं!

जुन्या ट्रंकेतील कवितांची वही

काढुन बसलेय आता,

माझी अनमोल ठेव!

त्यातले अर्धे तर तुझेच देणे-

प्रेमाचे कमी, दुर्लक्षाचे जास्त!

सांग ना

या कवितांच्या बदल्यात

काय देउन जाउ तुला?

कशी करू परतफेड

तू दिलेल्या जखमांची

आणि

माझ्या त्या विरहगीतांची?

तुझ्या त्या विरहाने

स्फुरलेल्या कविता,

लोकांची वाहवाही

पण माझ्या पापण्या ओल्या!

तुझ्या नकाराने कोलमडलेली मी,

उभी तुझ्याच मैत्रीच्या आधाराने!

तुझ्या कवितांचं दान मात्र

भरभरून दिलं सरस्वती ने!

मिळालं असतं प्रेम तुझं तर. .

ह्या कविता कशा जन्मल्या असत्या?

सांग ना रे-

तुझ्या त्या नकाराची परतफेड

आता कशाने करू???


Rate this content
Log in