प्रतिक
प्रतिक


समज गैरसमजांची
दाट विणली गेलेली जाळी,
अचानकच दोघांमधली!
ढगांनी दाटलेलं आभाळ
झाकाेळून आलेलं अन्
सर्वत्र पसरणारा अंधार!
सारं काही धुक्यागत
अस्पष्ट, अदृश्य , गुंतागुंतीचं!
सायंकाळी ती त्याच्या घरी आली,
गलबलून गेलेली, हतबल
सारं आभाळ ढवळून निघालं...
अन् कोसळला... मुसळधार पाऊस!
ती परत निघाली तेव्हा...
बाहेरचं आकाशही निरभ्र झालेलं,
स्वच्छ , नितळ, सदृश्य, स्वच्छंद!
एक हळवी
कोवळ्या उन्हाची तिरीप...
ढगाआडून डोकावताना,
मंद हसत होती..!