प्रतिभा
प्रतिभा
1 min
260
मनोमंदिरी होतसे
प्रतिभेचे आगमन
जावे गुंफित अक्षरे
मना भरती उधाण
साहित्यवेलीवरील
शब्द घोसच फुलांचे
मनी घोळती रुळती
क्रम जुळती तयांचे
सरस्वती गजानना
नित्य प्रारंभी स्मरावे
प्रतिभेची आराधना
आवाहन मनोभावे
उतरती झरझर
पानी शब्द प्रतिभेचे
दान मिळते रसिकां
भावपूर्ण कवितेचे
