प्रसन्न मन
प्रसन्न मन

1 min

233
मन करा रे प्रसन्न
कामे होती सरासरा
इच्छा मनातूनी येता
उत्साहाचा येई वारा (1)
मन असता प्रसन्न
जग दिसते सुंदर
उलगडी मऊ लड्या
रेशमाचे हे पदर (2)
मन असते अदृश्य
त्याचा ठावा ना ठिकाणा
संचारते शक्ती जोम
कलाकार प्रोत्साहना (3)
मन ठेवावे काबूत
संत महंत सांगती
अभ्यासाने साध्य होय
साधू संत त्या म्हणती (4)
मन वढाय वढाय
म्हणतात बहिणाई
अचपळ नावरेना
सांगे रामदास स्वामी (5)
अशा मनाला काबूत
कलाकार ठेवी सदा
नित नूत आविष्कार
दावे प्रसन्न मनाचा (6)