STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

प्रॉमिस डे लावणी

प्रॉमिस डे लावणी

1 min
629


सांज झाली लै वाट पाहिली

अजुनी नाही आला बाई

प्रीमिस डे चा बोऱ्या ग वाजला।।धृ।।


सकाळ पासून वाट लै पाहिली

त्याच्या आवडीची नेसली साडी

त्यावरी ग भरजरी खडी।।१।।


दुपारच्याला जेवण केलं

ओल सुक्क बाजूस केलं

तरी बी ते नाही आलं।।२।।


चारच्या ठोक्याला म्हंटल येईल

कधी नव्ह ते दर्शन देईल

आज तरी बाई कवेत घेईल।।३।।


आता बाई धीर ग सुटला

मायेचा बाई पान्हा फुटला

दिस बाई फुकट सरला।।४।।


सांज झाली लै वाट पाहिली

अजुनी नाही आला बाई

प्रीमिस डे चा बोऱ्या ग वाजला।।धृ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन