प्रलयंकारी
प्रलयंकारी




एकदा आलास तेच
रौद्र प्रलयंकारी
मनापुढे सारखेच
भयंकर काहीतरी (1)
पै पै जमवून आम्ही
छोटं खोपटं बांधलं
शून्यातून निर्मिलेलं
पाण्यात वाहून गेलं (2)
क्षणभर हबकले
एकदम सावरले
पिल्ले माझी बिलगली
मालकही भेदरले (3)
नारीच असते दुर्गा
धैर्यशाली संकटात
पदर खोचला मीच
धीरोदात्त प्रसंगात (4)
मोडला जरी संसार
हताश होऊ नकोस
अरे प्रलया विनाशी
तू पुन्हा येऊ नकोस (5)