पर्जन्य
पर्जन्य
1 min
169
रे सख्या पावसा, जीवनदायका।
तू जगन्तारका, धरित्रीचा ।।१।।
तुझ्या वाटेकडे, लागले हे डोळे।
आतडे हे जळे, सकलांचे ।।२।।
तू रे बरसता, मनेही हर्षिता ।
देई तृर्षातता, प्राणिमात्रा ।।३।।
तुझियाविना रे, अभिमानशून्य।
येई औदासीन्य, चराचरा ।। ४।।
रे वरुणराजा, असा बरस ना ।
घालवं अचैतन्या, कर मान्य ।।५।।
तुझिया मनीचा, कोणा नसे ठाव।
आसवा आठव, मानवाच्या ।।६।।
ओलेता दुष्काळ, कोरडा दुष्काळ।
निसर्गाचा काळ, नको होऊ ।।७।।
हवाहवासा तू, होशील राजमान्य।
अभिमानशून्य, वाटू नये ।।८।।
