परिवर्तन
परिवर्तन
1 min
192
अरे माणसा रे माणसा
नको वागुस हैवानाप्रमाणे
वाईट प्रवृत्ती सोडून दे
वाग सदा तू मानवाप्रमाणे...
नको कधी भ्रष्टाचार करू
नको कधी व्यभिचार करू
नको वाईट विचार करू
निसर्गाचा तू ऱ्हास करू....
थांबव तू स्त्री भ्रूणहत्या
मुलगा मुलगी भेदच नाही
मुलाप्रमाणे तू मुलीलाही
शिक्षणाची दे आता ग्वाही....
सद विचारांचे जाळे वीण
सदा पाझरू दे माणुसकीचे झरे
जाणं असू दे चांगल्या वाईटाची
आपल्या मागे हेच येणार बरे....
परिवर्तन म्हणजेच बदल ना
माणसा काळानुसार बदल कर
समाजात वावरताना मात्र
मनातला जागवू नको कधीच नर..
