प्रीती गंधाळली
प्रीती गंधाळली
1 min
3.2K
प्रेमाच्या या वेलीवरती
ही गंधाळलेली प्रीती
किरण स्फुरन होताच क्षणी
आंगनात माझ्या बहरूनी
सर्वांगी पिसारा फुलवती....
प्रसन्न या वातावरनी सख्या
मद्याा विणा मनी चढे ही धुंदी
झुलु दे मजला पाखरा प्रमाने
सख्या गावून जीवन गाणी
स्वप्न फुलोरा या मनांत झुलती......
उजळलेली ही सौख्याची ज्योती
जळु दे या ह्रदयात दिप्ती
वैभव तुझ्या या प्रेमाचे वसले
हवेहवेसे मज सौख्य मिळाले
या जन्मी मी उत्कर्षाने न्हाते.....
मनोमिलनाची झुळूक वाहती
उन्माद हा आभाळी दरवळती
तळपू दे मनी साथ तुज सवे
तु कधी नसतोस माझ्यासवे
शिशिरासम पानगळ होई मनाती.....

