STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

परीक्षा ( सहाक्षरी )

परीक्षा ( सहाक्षरी )

1 min
214

परीक्षा आजची

नसते मुलांची

सत्व परीक्षा ही

असे पालकांची


क्लास कॉलेजचा

दबाव तो किती ?

अभ्यास अभ्यास

करायचा किती ?


घरात तणाव

जातो हो वाढत

संपुर्ण ती रात्र

जागुन काढत


दहावी बारावी

टप्पे महत्वाचे

पर्याय जणू हे

आहे शेवटचे


निकाल चांगला

होती पेढेकरी

निकाल वाईट

ते सुतकधरी


Rate this content
Log in