परीक्षा (अभंग रचना)
परीक्षा (अभंग रचना)
1 min
289
दहावी बारावी। टप्पे महत्वाचेI
वेध परीक्षेचे। घरोदारी॥१॥
वर्षभर केला। अभ्यास घोकत।
येवो परीक्षेतI तेच सारे॥२॥
प्रश्न जीवनाचे। उत्तर सोडवी।
निकाल तो दावी। राज मार्ग॥३॥
गुणांचा आलेख। असतो चढता।
अपेक्षा पाहता। वाढलेल्या॥४॥
ताण तणावाचा। संयम राखावा।
चिंतनाचा ठेवा। कामी येई॥५॥
