परी...
परी...

1 min

11.3K
तुझे बोलके बोबडे बोल गोड
गोड स्मितहास्य, चाल नटखट
येई सदा परी तुझी आठवण
आठवण होता व्हावी छान भेट
भेट तुझ्या मिठीची स्वप्नात पाही
पाही पुढ्यात तुला, जवळ घेई
अंतरीत हर्ष गीत ऐकू येता
येता भाव दाटून, आनंद होई
भावनिक कल्लोळ काहीसा मनी
मनी स्पर्शाचा अनुभव प्रेमळ
क्षणोक्षणी तुझाच विचार असे
असे बालमनाचा, तुझा खट्याळ