प्रेरणादायी सखी
प्रेरणादायी सखी
1 min
324
ज्येष्ठ मैत्रीणीचा
फोन आला सकाळी
अगं पंच्याहत्तरीसाठी
शुभेच्छा लिही छानशी
पहिलीच वेळ माझी
गुणविशेष जाणले
दीर्घ आयुरारोग्य लाभो
शुभचिंतन केले
मैत्रीण खूष झाली
माझ्या शुभेच्छा बघून
समारंभात तिने
शुभेच्छा दाखवल्या वाचून
प्रेरणादायी मैत्रीणीमुळे
शत शुभेच्छा लिहिल्या
नामांकितांना घरी जाऊन
आदरपूर्वक दिल्या
शुभेच्छांची काव्यसुमने
पुस्तकही छापले
मान्यवरांना आवडले
आभिप्रायही मिळाले
