STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

3  

Sheshrao Yelekar

Others

प्रेमाधार

प्रेमाधार

1 min
27.4K


प्रेम हेच आहे

जीवनाचा मुलाधार

सर्व धर्माचा मुळ

आहे प्रेमाधार


प्रेम जिथं तिथं

तिथे नांदे सुख

प्रेमाच्या प्रवासात

विसरुन जातो दुःख


प्रेमाचा गर्भात

वात्सल्याचा निवास

म्हणून गर्भजलात बाळ

ममतेचा घेतो स्वास


प्रेमाच्या भाकरीला

तुपाचा सुवास

क्रोध घ्रृणेत किती

संसार झाले नास


संसारी जीवांना

एकमेकांचा प्रेमाधार

म्हणून एकमेव जीवसृष्टी

असलेली पृथ्वी गोलाकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन