प्रेमाचे विवाहबंधन
प्रेमाचे विवाहबंधन
1 min
440
वाद्य घोषांच्या निनादी
सखया तुझी मी झाले
चालताना सप्तपदी
रोमरोमी बहरले
कंकणांची किणकिण
मोहरले तनमन
दृष्टीभेटीतील क्षण
गोड विवाहबंधन
सारे सोडून तुझ्यासाठी
नवजीवनी मी आले
स्पर्श होता रोमरोमी
तृप्त मनोमनी झाले
स्पर्श तुझा रोमांचाचा
मी सर्वांगे मोहरते
काय जादू केलीस सखया
मी सदनी स्वर्ग पाहते
