प्रेमा तुझा रंग लाल आहे
प्रेमा तुझा रंग लाल आहे
प्रेमा तुझा रंग लाल आहे
माझं तुझ्यावर प्रेम आहे
जीवापाड प्रेम करून ही
प्रेयसीच्या मनात काळ का आहे
हेच मला समजत नाही ये......
प्रेमाचा अर्थ कांही लावत आहे
स्वच्छ नात विणवून ते टिकवायचं आहे
आज त्याच्यांनावाखाली कपटी भावनेने
पाहिलं जातं आहे. त्यामुळे मनात काजळी
बनत आहे.....
प्रेमाच्या नावाखाली चंगळवाद चालु आहे
त्याचा नुसता वापर करत आहेत खरं
प्रेम झालं तर् ते व्यक्त करता येतं नाहीं
लपून किती ठेवले तरी आज ना उद्या
उघडकीला आल्याशिवाय राहत नाही
फार काळ टिकत नाही......
खऱ्या प्रेमात आडे वेडे फ़ार असतात
कांही प्रश्न निर्माण खुप होतात
कांही कोड्यात पाडतात
काही उत्तरे मिळतात
कुठेतरी मने जुळतात.....
प्रेमात असतो रुसवा फुगवा
प्रेमात असतो विचाराचा चढ उतार
असाच पार करत राहतो बाजार
उत्तरे देऊन होतो बेजार.......
नेहमी म्हणतात प्रेम करावं खुल्लम खुला
आज त्यांची सीमाच नाहीं उरली नुसता
टाईमपास करून आयुष्य फुकट घालून
असाच एकटा सगळ्याना उरला जे करियर
होत धुळीला मिळवुन बसला......
प्रेम हे निर्मळ आहे.
प्रेम हे एक आकर्षण आहे
प्रेम हे ममता आहे.
प्रेम हें दोन जीवाचं मिलन आहे.
प्रेमाचं प्रतीक टिकवणं आपल्या हातात.
याचं रूपांतर वासनेने घेतले आहे....
प्रेमा तुझा रंग लाल आहे
माझं तुझ्यावर प्रेम आहे
जीवापाड प्रेम करून ही
प्रियकरच्या मनात संशय आहे
हेच मला उमगत नाही ये...
