" प्रेम "
" प्रेम "
तुझ्या प्रेमात मेणबत्ती प्रमाणे जळालो
प्रेमाच्या झुळूक यावी अन् प्रेमाची ज्योत न विझावी असाच वागलो ।
तुझ्या प्रेमात मेणबत्ती प्रमाणे जळालो
प्रेमात हळूच मेणावाणी विरघळलो
ज्योती वाणी आशेत जळत राहिलो ।
तुझ्या प्रेमात मेणबत्ती प्रमाणे जळालो
प्रेमात हळूच हृदय वातीप्रमाणेजळालो
ज्योति वाणी हळूच स्वतः संपत गेलो ।
तुझ्या प्रेमात मेणबत्ती प्रमाणे जळालो
प्रेमासाठी हळू हळू आयुष्यात जळालो
ज्योती संपली तेंव्हाअस्थित्वाने राहिलो
तुझ्या प्रेमात मेणबत्ती प्रमाणे जळालो
प्रेमासाठी आयुष्यभर मी जळालो
ज्योत हि प्रेमाचा प्रकाश तूला कळालो
तुझ्या प्रेमात मेणबत्ती प्रमाणे जळालो
प्रेमात ना तूला ,ना जगाला कळालो
ज्योति प्रमाणे पंचतत्वात मिळालो ।
*******************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव ) १४आक्टो२४
