प्रेम
प्रेम
1 min
1.6K
जगावेगळं काहीतरी करायचं
म्हणून प्रेम केलंय तुझ्यावर
अन् भर बाजारात विकलस तू मला
अंगावरच्या एका लुगड्यावर?
घरात जेव्हा तू आला माझ्या
नजरेत भरलास तू माझ्या
नोकर तू अन् मालकीण मी
हा भेदही न उरला तुझ्यामाझ्यात
आपणही एक स्वप्न बघावं
डोळ्यातून ते मनात यावं
स्पर्शा स्पर्शाने मोहरून
कुणी मला ही चोरून न्यावं
