प्रेम
प्रेम
मानवी जीवनात आपण
जोपासतो बहुतांश नाती,
त्यातील भावनिक आणि
हृदयस्पर्शी नातं "प्रीती".
नेहमीच प्रश्न पडतोय
प्रेम कशास म्हणावे?
मानवाने मानवाच्या केलेल्या
पूजेस' प्रेम 'म्हणावे.
एका हृदयातून दुसऱ्या हृदयापर्यंत
वाहणारी महानदी म्हणजे 'प्रेम',
फुलातील सुवासाप्रमाणे न दिसता
मधुरतेचे सिंचन करते ते 'प्रेम'.
वृक्षवेली शोधतात जसा
शीतल पाण्याचा ओलावा,
तसा आवडत्या व्यक्तीच्या
प्रेमस्पर्शाने लाभतो विलक्षण गारवा.
विविध नात्यांना घट्ट बांधणारा
'प्रेम' एक नाजूक धागा,
कोणीही मोजू शकत नाही
प्रेमाची लांबी-रुंदीमय जागा.
प्रेम म्हणजे हवाहवासा वाटणारा
सुंदर-मोहक असा अविष्कार,
एकमेकांना समजून छेडावी
नाजूक हृदयाची तार.
प्रेम करणे सोपे मात्र
निभावणं खूप कठीण असतं,
कारण प्रेम हे प्रेम असतं
त्यात तुमचं आमचं सेम असतं.
