प्रेम सर्वांभूती
प्रेम सर्वांभूती
1 min
449
प्रेम कधी फक्त व्यक्तीवर
नाही करता येत
प्रेम करावे सर्वांवर
ती भावना एक
प्रेम अशरीरही असते
प्रेम निःस्वार्थीही
प्रेम त्यागातही असते
प्रेम वासनामुक्तही
प्रेम करावे देशावर, विश्वावर
डोंगर दऱ्यांवर, पर्वतांवर
नद्यानाल्यांवर, सागरावर
वृक्षवल्लींवर, फळाफुलांवर
प्रेम कधीही कुणावरही करावे
फक्त ते खरे आणि निरपेक्ष हवे
सर्वांभूती प्रेम करता यायला हवे
मन बर्फासारखे निर्मळ हवे
