STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

।।प्रेम कुणावर करायचं।।

।।प्रेम कुणावर करायचं।।

1 min
180

प्रेम कुणावर करायचं, असं काही शास्त्र नसतं।

जसं माय बाळावर करते, तसं ते निरागस असतं।।धृ।।


जे काही करायचं, ते सारं जमजून उमजून करायचं असतं।

नंतर फसलो फसवलं म्हणून, बोंबलत फिरायचं नसतं।।

आणि उगाच कोणी कोणाला, टार्गेट करायचं नसतं।

कोर्ट-कचेऱ्या करीत, उगाच रिकामं फिरायचं नसतं।।१।।


आपण प्रेमात हरलो म्हणून, झुरत बसायच नसतं

गळफास लावून, आयुष्य मध्येच संपवायचं नसतं।।

शेण खाल्लंच असेल तर, बिल इतरांवर फाडायच नसतं।

आई-बापाच्या नावानं, गळा काढात बसायचं नसतं।।२।।


प्रेम पहिलं आपणच, आपल्यावर करायच असतं।

नंतर ते घरातल्या आई-बाबावर करायचं असतं।।

जसं म्हाताऱ्या आजी-आजोबांवर करायचं असतं।

तसं सासरी आलेल्या सुनेवरही करायचं असतं।।३।।


जसं प्रेम आभाळाच, धरणीवर असतं।

तसं गायीचं आपल्या पाडसावर असतं।।

फुलपाखरचं जसं, उमललेल्या फुलांवर असतं।

तसं प्रेम पाखरांचं, आपल्या पिल्लावर असतं।।४।।

प्रेम कुणावर करायच, असं काही शास्त्र नसतं।


Rate this content
Log in