Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meena Kilawat

Others

3  

Meena Kilawat

Others

प्रेम करीत तुझ्यावर

प्रेम करीत तुझ्यावर

1 min
6.8K


प्रेम करतो तुझ्यावर,गीत ओठी तुझेच येते,

आली गेली वादळे,राखून ह्रदयात ठेवतो......

दाटला वसंत ह्रदयी,पसारा मनी प्रेमाचा,

तरी मनी माझ्या, भास होई सावलीचा.......

माझ्या एवढे असेल कां प्रेम तिचे माझ्यावरी

करणार आहे कां तीच ,राज्य माझ्या ह्रदयावरी...

प्रेमात पडल्यावर असच कां होतय मला

तरी वेड्या माझ्या मना,कां लागावा लळा .....

मजकडे ती नेहमी यावे,असे मला वाटते,

भेट दुरुन ही होता ,मनास समाधान लाभते .....

न दिसता ती कुठेच, काहूर उठते मनोमनी,

पहावे जवळून तिला,वाटे मज क्षणोक्षणी .....

साक्षात्कार प्रीतीचा,भेट रस्त्याच्या आडोश्याला, 

वाटे व्हावी नजरानजर,चुकवून घरच्याला .....

कधी असे प्रेमाची,वेगळी धग शब्दाला,

कधी होई विचलीत मन,ते पडता कानाला ......

गुप्त प्रेम मनातल,कां सांगु वाटे तिला,

हाच एक ध्यास ,कां असतो मनाला ......

सहज फिरकलो मी,त्या निलगीरी बागेला,

उजाळा मिळाला , माझ्या नव भविष्याला .....

इथेच दिला शब्द तिने ,नयनी लाजून प्रेमाचा

घेतला अखेर कानोसा,येथे माझ्या मनाचा ....  


Rate this content
Log in