STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

प्रेम आटू लागले

प्रेम आटू लागले

1 min
28.5K


*वृत्त:-* देवप्रिया/कालगंगा

*लगावली:-* गालगागा, गालगागा, गालगागा, गालगा



वागणे पाहून त्यांचे दुःख दाटू लागले

दाटलेल्या हुंदक्यांनी ऊर फाटू लागले


झिजवले आयुष्य माझे मी जयांच्या कारणे

तेच माझ्या वैभवाचे पंख छाटू लागले


वाढले लाडात ज्यांच्या ते उपाशी राहती

बाप, आई का मुलांना भार वाटू लागले


जिंकले ज्यांच्या मतांनी दूर त्यांना ठेवले

आज पुन्हा का तयांचे पाय चाटू लागले


माणसाची वागण्याची जाहली न्यारी तऱ्हा

"पंडिता"साठी जगाचे प्रेम आटू लागले


साहित्याला गुण द्या
लॉग इन