प्रेम आठवांचे
प्रेम आठवांचे
1 min
269
आठवणीतलं प्रेम
खोल मनात बसतं
गोडी गुलकंदावाणी
वास गुलाबाचा देतं (१)
आई बाबा दादा ताई
जीव लावती अतूट
आठवाने डोळे ओले
शिक्षणाने ताटातूट (२)
प्रिय मित्र शाळेतील
समूहात फोनवरी
आठवणी नव्या जुन्या
गहिवर दाटे उरी (३)
सख्खे शेजारी आपले
जवळचे नात्याहूनी
येती धावूनी कधीही
हात प्रेमाचा देऊनी (४)
प्रेम प्रेयसीचे मज
मनी आठव प्रेमळ
स्वप्न सहजीवनाचे
लवकर हो उजळ (५)
