STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

प्रेम आंधळे असते

प्रेम आंधळे असते

1 min
312

"प्रेम आंधळे असते...

सार जग पाहत असते.

हे चारचौघाच्या मनांत खुपते

आज ना उद्या कळते

खरं प्रेम कधीच टिकत नसते

प्रेम आंधळे असते....!


प्रेमात सगळे माफ असते

रोज रोज कुठे भेटायचे याचे

मोजमाप नसते प्रेम करणाऱ्याला

वेळेचे भान नसते.

दिवस रात्र तुज्या नजरेसमोर राहू वाटते

"प्रेम आंधळे असते...


सार जग पाहत असते

हे चारचौघाच्या मनांत खुपते

आज ना उद्या कळते

खरं प्रेम कधीच टिकत नसते

प्रेम आंधळे असते....!


तुज्यात माझं सार आयुष्य रंगवू वाटते

घरच्या विरोधाला काय उत्तर देऊ हे समजत नसते

तुला मिळवायचा प्रयत्न करून ही प्रेम अधुरच असते.


तुझ्यात रडू

तुझ्यात हसू

तुझ्यात सर्वकाही गमवू

तुला मी कस विसरू

प्रेम आंधळे असते...


Rate this content
Log in