STORYMIRROR

Mina Shelke

Others

3  

Mina Shelke

Others

प्रारब्ध

प्रारब्ध

1 min
14.3K


उगवला दिवस तो काळा

मरणाचा घेऊन सोहळा

अंहकाराच्या खेचाखेचीत,

फुटला पुण्यवंत कोहळा


अंतरीचा मनोव्यापार

शब्दावाचून गुदमरला

आपुल्याच माणसांच्या

गर्दीत हवालदिल जाहला


संयमाचा तुटला बांध

नैराश्याने खेचली तान

क्षण तो गेला साधून

घेऊन कलेवर मान


दुःखात आधारवड झालेला

स्वतःहा मात्र निराधार

कोंडमारा झालेल्या मनावर

किती सोसला अत्याचार


माणूस असो की साधूमहंत

प्रारब्धाला नसे कुणी तारण

चुकले ना भोगाचे ग्रहण

काहीतरी लागते फक्त कारण


Rate this content
Log in