प्राण्यांची शाळा
प्राण्यांची शाळा
1 min
281
जंगलात प्राण्यांची शाळा
सुरू करावी एकदा
सिंह राजांनी काढला
जोरदार फतवा
ससोबा आले धावत
छोटीशी वही घेऊन
पेन ऐटीत अडकवून
पहिल्या रांगेत बसून
कोल्हा म्हणाला माझे
जेवण नाही झाले
खाऊन अंमळ थोडे
उशीरानेच येणे
जिराफ म्हणाला सांगा
लिहू मी कसे काय?
मान माझी उंचच उंच
वही धरायची कशी काय?
हत्ती म्हणाला मला
बसताच येत नाही
सोंडेत पेन धरुन
लिहिताच येत नाही
शिक्षक शिस्तीचे वाघोबा
डरकाळ्या फोडू लागले
सगळे आले गुपचूप
अभ्यास करू लागले
