पोटासाठी
पोटासाठी
पोरंबारं धरुनी तो
कामासाठी भटकला
घाम गाळून आपले
एकट्यात का रडला?
दशा पाहून पोरांची
पाणी आले डोळ्यात
काय कमवून देवा
माझ्या नेणार घरात
सोय झाली रे खाण्याची
माझ्या या मुलाबाळांची
कशी औषध घेऊ रे
माझ्या म्हाताऱ्या आईची
दया समृद्धी ठेव रे
आमच्याशी तू जवळी
दूर नको करू असा
इच्छा आहे रे एवढी
पोटासाठी असा रोज
भटकत आहे रस्ता
माझ्या जीवनात देवा
दुःख असे का असता?