पोरीची जात
पोरीची जात
रंगानं गोरी गोरी पान
कोवळी कांती नितळ मान
नाजूक गोड तिच दिसणं
गालातल्या गालात सुबक हसणं
पडद्याआड तिला ठेवशील का?
का तर म्हणे पोरीची जात
करेल कोणीतरी तिचा घात
चमकदार लांब केस तिचे
मोकळे सोडायला तिला चोरी
नखशिखांत देहावर तिच्या
सजलेली जरी साडी चोळी
तरीही घोशात ठेवशील का?
का तर म्हणे पोरीची जात
करेल कोणीतरी तिचा घात
हसतमुख अन् लाघवी लेक
भरभरून द्यावे सुख तिला
पण घडीघडीला बसतो चेक
हटकावे लागते त्या बापडीला
तरीही पंखाखाली घेशील का?
का तर म्हणे पोरीची जात
करेल कोणीतरी तिचा घात
बनवाव आत्मनिर्भर तिला
स्वरक्षणाचे धडे द्यावे
पाऊल टाकायचय धाडसानं तिला
स्वावलंबी तीने व्हावे
पुढं जायला शिकवेन तिला
पोरीची जात जणू दिव्याची वात
बुरसटलेल्या विचारांची फेकून दे कात
