पोर जल्माले उनी
पोर जल्माले उनी
पोर जन्माले उनी, जस कापुसनं पेंबरू
चीडी धाईसन उनी, जस जंगलन पाखरू ।।
जसी स्वर्गानी ती परी, तीले दीन खूप रूप
तीना भूरा भूरा केस, ती आवडस लय खूप
तीले नजर ना लागो, नजर तीनी मी उतारू
भर चीडीसन घर, तीले खांंद्या कढे धरू ।।
तीले म्हणू आजी माय, ती बापनी से लाडकी
तीना बापमा से जीव, तीले कोण पारकी
तीनी बात मोठी मोठी, ती बोलस हुरू हुरू
राम दााादान्या दोन गोष्टी, सांगस सुरू सुरू ।।
तीना डोयातला आंसू ना, लागनात चार धार
मामा मामीनी ती आठवण, लय करस फार
तठे मामा मावशीना पोर, सार गांव आते मीरू
चला वावरमा जाऊत, सार जंगल आते फिरू ।।
तीना रूबाप लयभारी, सर्वा पोरसमा ती न्यारी
हाही पोर कोणी आशा, से रत्नानी ती परी
परी रूपनी किमयानी, कस वर्णन मी करू
तीले देवन ते देन, तठे मी काय करू ।।
