STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

पोळा

पोळा

1 min
41K


सण आला पोळ्याचा

सजली ही बैलजोडी

चालली झोकात जणू

कोणी आसामी बडी

     धारदार असती शिंग

     डोळे काजळाची खाण

     पिळदार बांधा भारी

     कसदार रुंद मान

रेशमी झुल अंगावर

पायी छुमछुम वाळा

नाकात शोभते वेसण

गळा वाजे घुंगुरमाळा

     सालभर राबती शेतात

     मी त्यांचा ऋणाईत

     जनावरे जरी ती मूकी

     माझ्या गळ्यातील ताईत

करु आज खांदेमळन

घालूया अभ्यंगस्नान

खऱ्या या पोशिंदयाचा

आज करुया रे मान

     सर्जा -राजा माझा प्राण

     पुरणपोळी देतो खाया

    ' नका घेऊ धनी गळफास'

     म्हणती मज करिती माया


साहित्याला गुण द्या
लॉग इन