पंख तारुण्याचे
पंख तारुण्याचे
1 min
156
मला वाटते अंबरी
उंच स्वैर विहरावे
पंख तारुण्याचे घ्यावे
नील नभात उडावे
वाद्य माझ्या आवडीचे
सूर तालात वाजावे
मंद लकेर तयाची
कुणी ऐकण्यास यावे
जावे समुद्रकिनारी
चिंब लाटांत भिजावे
माझे हलके पाऊल
वाळूमध्ये उमटावे
जावे हिमशिखरासी
हिम घट्ट गोठलेले
साहसाची परिसीमा
ध्वज शिखरी रोवावे
पंख तारुण्याचे देई
देव तारुण्यापुरते
आता दिवास्वप्नांतूनी
कधीतरी विहरते
