STORYMIRROR

Kishor Zote

Classics

3  

Kishor Zote

Classics

पिंजऱ्यात आयुष्याच्या ( सहाक्षरी )

पिंजऱ्यात आयुष्याच्या ( सहाक्षरी )

1 min
27

हास्य लुप्त झाले

केंव्हाचे कळेना

आरसाही आता

ओळख देईना.....१


स्वतःच्या वर्तुळा

बाहेर पडेना

संसाराचा गाडा

परिघ सोडेना.....२


आप्तजन सारे

वळून पाहिना

वारे बदलाचे

सोसता सोसेना...३


मतलबी कावा

कळता कळेना

आपले सारेच

आधार वाटेना...४


पिंजऱ्यात असा

सुटता सुटेना

आयुष्याच्या वाटा

काटेच संपेना.....५



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics